सोमवार, १५ जानेवारी, २०१८

सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात १००% एफडीआयला मंजुरी - ९ जानेवारी २०१८

सिंगल ब्रँड रिटेल क्षेत्रात १००% एफडीआयला मंजुरी - ९ जानेवारी २०१८

* परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन सिंगल ब्रँड रिटेल ट्रेंडिंग तसेच बांधकाम क्षेत्रात १००% एफडीआयला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

* याशिवाय परदेशी गुंतवणूकदार आणि परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांच्या प्राथमिक बाजारांतर्गत पॉवर एक्सेंजमध्ये देखील गुंतवणुकीसाठी मंजुरी दिली जाते.

* काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने संरक्षण, बांधकाम, विकास, विमा, पेन्शन, नागरी हवाई वाहतूक आणि फार्मा क्षेत्रातील एफडीआय धोरणामध्ये सुधारणा केल्या होत्या.

* एफडीआयला मंजुरी दिल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूक, उत्पन्न आणि रोजगारात मोठी संधी उपलब्द होणार आहे.

* एअर इंडियामध्ये नवसंजीवनी देण्यासाठी एअर इंडियामध्ये भागीदारी करता येणार आहे. परंतु कंपनीची मालकी आणि नियंत्रण भारताकडेच राहणार आहे.

* एअर इंडिया देशातील एकमेव सार्वजनिक वाहतूक हवाई प्रवासी वाहतूक कंपनी असून तिच्यावर ५२,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.