सोमवार, १५ जानेवारी, २०१८

इस्रोचे ऐतिहासिक १०० वे उपग्रह प्रक्षेपण - १० जानेवारी २०१८

इस्रोचे ऐतिहासिक १०० वे उपग्रह प्रक्षेपण - १० जानेवारी २०१८

* भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो १२ जानेवारी रोजी पीएसएलव्ही सी - ४० हे प्रक्षेपक ३१ उपग्रहांसह अंतराळात पाठवत नवा इतिहास रचला.

* श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले. हे इस्रोचे ऐतिहासिक १०० वे उपग्रह प्रक्षेपण झापे. हे इस्रोचे ऐतिहासिक १०० वे उपग्रह प्रक्षेपण होते.

* ३१ उपग्रहामध्ये यात भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश आहे. त्यात भारताच्या हवामान बदल टिपणाऱ्या 'कार्टोसॅट-२' या उपग्रहाचाही समावेश आहे.

* याबरोबरच अमेरिकेचे सर्वाधिक १९, दक्षिण कोरियाचे ५ आणि कॅनडा, फ्रान्स, ब्रिटन आणि फिनलँडचे प्रत्येकी १ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.

* 'कार्टोसॅट-२' हा उपग्रह ७१० किलोग्रॅम असून तो भारताचा 'अवकाशातील डोळा' म्हणून ओळखला जात आहे. आकाशातून पृथ्वीचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहात आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर पूर्व आणि पश्चिम सीमेवर शत्रू राष्ट्रावर नजर ठेवण्याचे महत्वाचे कामही हा उपग्रह करणार आहे.

* इस्रोने १९९९ पासून व्यवसायिक शाखेच्या मदतीने परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरु केला होता.

* फेब्रुवारी २०१७ मध्ये इस्रोने एकाचवेळी ७ देशांचे १०४ उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा एकाचवेळी ३७ उपग्रह अवकाशात सोडण्याचा मोडीत काढला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.