बुधवार, १७ जानेवारी, २०१८

संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०१६ - १८ जानेवारी २०१८

संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०१६ - १८ जानेवारी २०१८

* केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष २०१६ च्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

* ज्येष्ठ कलावंत मोहन जोशी, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मा तळवलकर, प्रभाकर कारेकर, तबला वादक अरविंद मुळगावकर यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

* संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती प्राप्त पुरस्कार्थीना ३ लाख रुपये रोख, अंगवस्त्र आणि ताम्रपट प्रदान करण्यात आले. यावर्षी ४ मान्यवरांना अकादमी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली तर ४३ कलाकारांना अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

* चित्रपट तसेच नाटकातून अभिनय प्रसिद्ध करणारे प्रसिद्ध कलावंत मोहन जोशी यांना अभिनय क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी यंदाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

* पद्मा तळवलकर या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत. तळवलकर यांनी ग्वाल्हेर, किराणा आणि जयपूर घराण्यातून खयाल गायकीचे शिक्षण घेतले आहे.

* पंडित प्रभाकर कारेकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत. त्यांचा जन्म गोव्याचा असून त्यांची कारकीर्द ही मुंबईतील आहे. त्यांनी आग्रा घराणा आणि ग्वाल्हेर घराण्यातून शास्त्रीय गायनाने धडे गिरविले जात.

* संगीत क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. प. मुळगावकर यांनी उस्ताद बालालाल इस्लामपूरकर यांनी उस्ताद अमीर हुसेन खान यांच्याकडून तबला वादनाचे धडे गिरविले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.