रविवार, २८ जानेवारी, २०१८

स्वस्त राहण्यासाठी भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर - २९ जानेवारी २०१८

स्वस्त राहण्यासाठी भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर - २९ जानेवारी २०१८

* जगात राहण्यासाठी स्वस्त असलेल्या देशामध्ये भारताने दुसरा क्रमांक मिळविला आहे. यात दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आहे.

* गो बँकिंग्स रेट्स या संस्थेने याविषयी ११२ देशांची पाहणी केली आहे. या पाहणीत भाडे, किराणा, सामानाचे भाव, किरकोळ चलनवाढ यांचा विचार करण्यात आला आहे.

* पहिल्या ५० स्वस्त देशामध्ये नेपाळमधील भाडे सर्वात कमी असून, त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. किराणा सामानाचे भावही भारतात कमी असल्याने एका व्यक्तीला राहण्यासाठी पर्यायाने खर्चही कमी होतो.

* पहिल्या ५० देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देशही भारत आहे. स्वस्त देशांच्या या यादीत कोलंबिया १३, पाकिस्तान १४, नेपाळ २८ आणि बांगलादेश ४० व्या स्थानी आहेत.

* भारतात नागरिकांची खरेदी क्षमताही कमी आहे. भारतातील खरेदी क्षमता २०.९ टक्क्याने कमी असून, भाडे ९५.२% स्वस्त, तर वस्तूचे भाव ७४.४ टक्क्याने स्वस्त आहेत. असे पाहणीत नमूद करण्यात आले आहे.

* या पाहणीसाठी सर्व देशांशी न्यूयॉर्कशी तुलना करण्यात आली आहे. पहिले स्वस्त ५० देश न्यूयॉर्कपेक्षा ७० टक्के स्वस्त आहेत. या यादीत बर्म्युडा ११२, बहामा १११, हाँगकाँग ११०, स्वित्झर्लंड १०९ आणि घाना १०८ व्या स्थानी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.