सोमवार, २९ जानेवारी, २०१८

६० वे ग्रॅमी पुरस्कार २०१८ विजेत्यांची यादी - ३० जानेवारी २०१८

६० वे ग्रॅमी पुरस्कार २०१८ विजेत्यांची यादी - ३० जानेवारी २०१८

* संगीत जगतातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी पहाटे झाला. यात आर अँड बी स्टार ब्रुनो मार्स याला २४ वे मॅजिक अल्बमसाठी एकूण ५ ग्रॅमी पुरस्कार मिळाले.

* त्याला 'अल्बम ऑफ द ईअर' व रेकॉर्ड ऑफ द ईअर' हे दोन सन्मान प्राप्त झाले. त्याचा हा अल्बम ग्रॅमी पुरस्कारात २४ कॅरेट सोन्यासारखा चमकला. मार्स याने जे झेड ४-४४, लॉर्ड हिचा मेलोड्रामा, केंड्रिक लामारचा डॅन्म, गम्बीनोचा अवेकन माय लाईफ यांना मागे टाकले.

* मार्स याला एकूण सात प्रवर्गात मानांकन मिळाले आहेत. त्यात बेस्ट इंजिनियर्ड अल्बम या गटाचाही समावेश आहे. बत्तीस वर्षाचा ब्रुनो मार्स याने वर्षातील उत्कृष्ट गाणे, आर अँड बी उत्कृष्ट कामगीरी, हे पुरस्कार दॅट्स व्हॉट आय लाईक व २४ के मॅजिकसाठी पटकावले.

* त्याला उत्कृष्ट आर अँड बी अल्बम पुरस्कारही मिळाला. वर्षातील उत्कृष्ट गाण्यासाठी लुईस फॉंसी व डॅडी याकी, ज्युलिया मायकेल्स, ऍलिसिया कारा व खालिद यांचा समावेश आहे.

* यंदाच्या पुरस्कारात लेडी गागा, टेलर स्विफ्ट, केशा यांच्यासह अनेक महिला कलाकारावर अन्याय झाला. ८६ पैकी केवळ १७ महिलांना पुरस्कार मिळाले.

* शकीराच्या अल डोराडो या अल्बमला सर्वोत्कृष्ट लॅटिन अल्बम म्हणून पुरस्कार मिळाला. तर ऍलिसिया कारा हिला उदयोन्मुख कलाकार म्हणून पारितोषिक मिळाले.

* अल्बम ऑफ द ईअर - ब्रुनो मार्स - २४ के मॅजिक अल्बम.
* रेकॉर्ड ऑफ द ईअर - ब्रुनो मार्स - २४ के मॅजिक अल्बम.
* सॉंग ऑफ द ईअर - ब्रुनो मार्स - दॅट्स व्हॉट आय लाईक.
* बेस्ट न्यू आर्टिस्ट - ऍलिसिया कारा.
* बेस्ट रॉक अल्बम - द वॉर ऑन ड्रग्स [अ डीपर अंडरस्टँडिंग]
* बेस्ट पॉप अल्बम - एड शिरन [डिव्हाइड]
* बेस्ट आर अँड बी अल्बम- ब्रुनो मार्स - २४ के मॅजिक.
* बेस्ट रॅप अल्बम - केड्रिक लामार [डॅम]

* गेल्या काही वर्षात टेलर स्विफ्ट, लेडी गागा, बियॉन्से आणि अडेल आदी दिग्गज गायिकांमुळे झाडून साऱ्या ग्रॅमी पुरस्कारावर महिला कलाकारांनी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शिरस्ता यंदा मोडला.

* बऱ्याच वर्षानंतर मानाच्या साऱ्या पुरस्कारासह पुरुष कलाकारांनी ग्रॅमी पुरस्कारावर बाजी मारली. सर्व महत्वाचे पुरस्कार ब्रुनो मार्स, केड्रिक लामार, एड शीरन यांनी पटकावले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.