बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

जगातील श्रीमंत देशाच्या यादीत भारत ६ व्या क्रमांकावर - ३१ जानेवारी २०१८

जगातील श्रीमंत देशाच्या यादीत भारत ६ व्या क्रमांकावर - ३१ जानेवारी २०१८

* जगातील श्रीमंत देशाच्या यादीत भारताने सहावा क्रमांक पटकावला आहे. भारताची एकूण संपत्ती २०१७ अखेर ८ हजार २३० अब्ज डॉलर असून, या यादीत अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे.

* 'न्यू वर्ल्ड वेल्थ' ने याबाबतचा अहवालानुसार अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत देश ठरला आहे. अमेरिकेची एकूण संपत्ती २०१७ मध्ये ६४ हजार ५८४ अब्ज डॉलर होती.

* चीन दुसऱ्या क्रमांकावर असून चीनची संपत्ती २४ हजार ८०३ अब्ज डॉलर आहे. जपान तिसऱ्या क्रमांकावर असून, संपत्ती १९ हजार ५२२ अब्ज डॉलर आहे.

* देशाच्या एकूण संपत्ती म्हणजे देशातील व्यक्तींची खासगी संपत्ती गृहीत धरण्यात आली आहे. यामध्ये मालमत्ता, रोकड, रोखे व्यवसाय यांचा समावेश आहे.

* या अहवालात सरकारी निधीचा समावेश करण्यात आलेला नाही. यादीत ब्रिटन चौथ्या क्रमांकावर असून संपत्ती ९ हजार ९१९ अब्ज डॉलर आहे. जर्मनी पाचव्या क्रमांकावर असून संपत्ती ९ हजार ६६० अब्ज डॉलर आहे.

* भारताची संपत्ती २०१६ मध्ये ६ हजार ५८४ अब्ज डॉलर होती. ती २०१७ मध्ये २५ टक्क्यांनी वाढून ८ हजार २३० अब्ज डॉलरवर होती. दरम्यान, याच कालावधीत चीनची संपत्ती २२ टक्क्यांनी आणि जागतिक संपत्ती १२ टक्क्यांनी वाढली आहे.

* जागतिक संपत्ती २०१६ अखेर १९२ ट्रिलियन डॉलर होती. ती २०१७ अखेरीस २१५ ट्रिलियन डॉलर एवढी झाली. भारताची संपत्ती २००७ ते २०१७ या दशकात ३ हजार १६५ अब्ज डॉलरवरून १६० टक्क्यांनी वाढून ८ हजार २३० अब्ज डॉलर एवढी झाली.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.