शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

अर्थसंकल्पाबाबत काही महत्वाच्या बाबी - २७ जानेवारी २०१८

अर्थसंकल्पाबाबत काही महत्वाच्या बाबी - २७ जानेवारी २०१८

* केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. करांची रचना काय होईल, येत्या वर्षांमध्ये कोणत्या सुविधा, योजना मिळतील आणि कोणती उत्पादने स्वस्त होणार याची माहिती घेण्यासाठी नागरिक प्रयत्नशील असतात.

* या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या बाबी येथे जाणून घेऊन मोरारजी देसाई हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री आहेत. त्यांनी १० वेळेस अर्थसंकल्प मांडला.

* १९९९ पर्यंत बजेट संध्याकाळी ५ वाजता सादर केले जाई. मात्र १९९९ पासून ते सकाळी ११ वाजता सादर केले जाऊ लागले.

* २०१८-१९ या वर्षासाठी सादर केले जाणारे बजेट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील चालवल्या जाणाऱ्या या रालोआ सरकारचे शेवटचे पूर्ण बजेट असेल.

* २०१९ साली देशामध्ये मध्यावधी निवडणूका होत आहेत. २०१७ साली म्हणजे गेल्यावर्षी सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र करण्यात आला. ९२ वर्षे हे दोन्ही अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात होते.

* डॉ मनमोहनसिंग, यशवंत सिंग यांनी सलग पाच अर्थसंकल्प मांडले आहेत. १ फेब्रुवारी २०१८ साली बजेट मांडल्यवार अरुण जेटलीसुद्धा सलग पाच अर्थसंकल्प मांडले आहेत. १ फेब्रुवारी २०१८ साली बजेट मांडल्यावर अरुण जेटलीसुद्धा सलग पाच अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री होतील.

* स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आर के षण्मुख चेट्टी यांनी मांडला. २६ नोव्हेंबर १९४७ रोजी त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.

* मोरारजी देसाई हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री होत. त्यांनी १० वेळेस अर्थसंकल्प मांडला आहे.

* पी चिंदबरम यांनी ८ वेळा अर्थसंकल्प मांडून मोरारजी देसाई यांच्यानंतर दुसरा क्रमांक पटकाविला. प्रणव मुखर्जी, यशवंत सिन्हा, यशवंतराव चव्हाण आणि सी. डी. देशमुख यांनी ७ वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे.

* प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदावरती कार्यरत असताना राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आणि ते राष्ट्रपती झाले.

* १९९९ पर्यंत बजेट संध्याकाळी ५ वाजता सादर केले जाई. मात्र १९९९ पासून ते सकाळी ११ वाजता सादर केले जाऊ लागले. सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करणारे यशवंत सिन्हा हे पाहिले अर्थमंत्री ठरले.

* साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सादर केले जाई. मात्र गेल्या वर्षीपासून तो १ फेब्रुवारीला सादर करण्याचे निश्चित झाले आहे. वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी हे बदल केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

* अर्थसंकल्पाची निर्मिती ही अत्यंत गोपनीय बाब समजली जाते आणि अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण होईपर्यंत त्यातील माहिती बाहेर समजू नये याची काळजी घेतली जाते. या प्रक्रियेच्या सुरवातीच्या दिवशी एका मोठ्या कढईमध्ये हलवा तयार केला जातो.

* या कार्यक्रमाला स्वतः अर्थमंत्री उपस्थित राहतात. तसेच अर्थराज्यमंत्रीही यावेळेस उपस्थित राहतात. हा कार्यक्रम संपल्यावर साधारणतः १०० कर्मचारी नॉर्थ ब्लॉक बेसमेंटमध्ये जातात. दहा दिवस अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया सुरु असते.

* या काळामध्ये कर्मचाऱ्यांच्या आपल्या कुटुंबीय, मित्र, नातेवाईक यांच्याशी कोणताही संपर्क ठेवता येत नाही. त्यांना वापर करता येत नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर अधिकाऱ्यांचे निरीक्षण असते.

* नॉर्थ ब्लॉकमध्ये अत्यंत चांगल्या क्षमतेचा मोबाईल जॅमर बसवल्यामुळे कोणतीही माहिती मोबाईलवरून बाहेर जाऊ शकत नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.