मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

राज्यातील १६ जिल्हे 'स्वच्छ' म्हणून घोषित - १६ जानेवारी २०१८

राज्यातील १६ जिल्हे 'स्वच्छ' म्हणून घोषित - १६ जानेवारी २०१८

* पंतप्रधान स्वच्छ भारत अभियानात देशातील तीन लाख  नऊ हजार १६१ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. देशातील ३०३ जिल्हे हागणदारीमुक्त झाली आहेत.

* यात नागपुर, कोल्हापूर, नगर, पुण्यासह महाराष्ट्रातील १६ जिल्हे व ३४ हजार गावांचा समावेश आहे. राज्यातल्या ३० जिल्ह्यात १००% शौचालायची उभारणी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

* केंद्रीय पेयजल व स्वछता मंत्रालयाने देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत [ग्रामीण] जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

* देशात गेल्या सव्वातीन वर्षात पाच कोटीहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. या अहवालानुसार सन २०१५-१६ मध्ये राज्यात ६०५३ गावे हागणदारी मुक्त जाहीर झाली होती.

* महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, जालना, बीड, नगर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, व रायगड या जिल्ह्याचा त्यात समावेश आहे.

* राज्यातल्या ३० जिल्ह्यात १००% घरगुती शौचालयाची उभारणी झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. नंदुरबार, जळगाव, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, व गडचिरोली या सहा जिल्ह्यात घरगुती शौचालय उभारणीचे काम ९० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहेत.

* महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात ५० लाख ८ हजार ६०१ घरगुती शौचालये बांधण्यात आली. २०१४-१५ या वर्षात राज्यात चार लाख ३१ हजार शौचालये बांधण्यात आले.

* सन २०१५-१६ मध्ये ९ लाख शौचालये, २०१६-१७ मध्ये २० लाख शौचालये, २०१७-१८ मध्ये १८ लाख शौचालये बांधण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.