बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

रामसिंह परमार 'अमूल' चे अध्यक्ष - ३१ जानेवारी २०१८

रामसिंह परमार 'अमूल' चे अध्यक्ष - ३१ जानेवारी २०१८

* राज्यसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपवासी झालेले आणि नंतर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या रामसिंह परमार यांना शहा कृपेने मोठी लॉटरी लागली असून त्यांना 'गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ' अर्थात अमूलचे अध्यक्ष करण्यात आले.

* शहरामधील भाजपचे आमदार जेठा भारवाद हे मात्र उपाध्यक्षपदी कायम आहेत. पंचमहाल येथील 'पंचामृत डेअरी' चे नेतृत्व करतात. अमूलच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

* परमार आता 'साबर डेअरी' चे अध्यक्ष जेठा पटेल यांची जागा घेतील, पटेल यांची ऑगस्ट २०१५ मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

* गुजरातमधील सर्व दूध संघाची सर्वोच्च संस्था म्हणून 'अमूल' ला ओळखल्या जाते. या दूध संघाच्या देशाच्या अन्य भागात देखील शाखा असून त्यांची वार्षिक उलाढाल साधारणपणे २७ हजार कोटी रुपयाच्या घरात आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.