बुधवार, १७ जानेवारी, २०१८

'एमपीएससी' च्या प्रवेशप्रक्रियेला स्थगिती - १८ जानेवारी २०१८

'एमपीएससी' च्या प्रवेशप्रक्रियेला स्थगिती - १८ जानेवारी २०१८

* पुढील सुनावणी होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या [एमपीएससी] प्रवेशप्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली.

* विद्यार्थी गुणवत्तेच्या निकषावर अर्ज करत असतील तर त्याला विरोध कशाला करता, असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी सरकारला विचारला.

* आरक्षित कोट्यातील अनेक विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेसाठी महिला खुला वर्ग, क्रीडा वर्ग किंवा खुल्या वर्गातून अर्ज केले आहेत.

* मात्र राखीव कोट्यातील विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे अर्ज केल्याच्या कारणावरून सरकारने हे अर्ज बाद ठरविले आहेत. याविरोधात याचिकादार अजय मुंडे यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

* प्रवेशप्रक्रियाच्या विविध टप्प्यावर या विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचा दावा याचिकादाराने केला आहे. न्या आर एम बोर्डे व न्या राजेश केतकर यांच्या खंडपीठाने सुनावणी केली.

* उच्च न्यायालयानेही यापूर्वी अशाप्रकारे अर्ज दाखल अपात्र ठरविले जात असल्यास तो न्यायालयाचा अपमान आहे. असे मत खंडपीठाने व्यक्त केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.