शनिवार, २७ जानेवारी, २०१८

डेन्मार्कची वोंजियाकीने ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला एकेरीपद पटकावले - २८ जानेवारी २०१८

डेन्मार्कची वोंजियाकीने ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला एकेरीपद पटकावले - २८ जानेवारी २०१८

* डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित कॅरोलिना वोंजियाकीने हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकवले. अंतिम सामन्यात तिने रुमानियाच्या अग्रमानांकित सिमोना हालेप हिच्यावर ७-६, ६-३, ६-४, असा विजय मिळविला.

* यासह जागतिक क्रमवारीत हालेप नंबर वन वरून पायउतार झाली असून वोंजियाकीने नवे पद प्राप्त केले आहे. वोंजियाकीचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.

* नंबर वन आणि दोघीच्याही पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या दृष्टीने नंबर वन पद आणि नंबर टू दरम्यान ही प्रतिष्ठेची लढत होती.

* सिमोनाविरुद्धचा ७ लढतीतील तिचा हा ५ वा आणि सलग चौथा विजय होता. सिमोनाला फ्रेंच ओपनच्या दोन उपविजतेपदावर आता पुन्हा एकदा समाधान मानावे लागले.

* वोंजियाकी ही यापूर्वी २०१० आणि २०११ मध्ये नंबर वन होती. यापूर्वी २००९ व २०१४ मध्ये तिला यूएस ओपनच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

* २०११ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ती मॅचपॉईंटवरून चीनच्या ली ना कडून पराभूत झाली होती. वोंजियाकी हे पहिलेच ग्रँडस्लॅम आहे. हा सामना तब्बल २ तास ५० मिनिटे रंगला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.