बुधवार, १७ जानेवारी, २०१८

हज यात्रेसाठी अल्पसंख्यांकांचे अनुदान बंद - १७ जानेवारी २०१८

हज यात्रेसाठी अल्पसंख्यांकांचे अनुदान बंद - १७ जानेवारी २०१८

* हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान यंदापासून बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज ही माहिती दिली.

* बंद घेतलेल्या हज अनुदानाचा उपयोग हा अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक सशक्तीकरणासाठी केला जाईल. अशी माहिती नक्वी यांनी दिली.

* यामुळे १ कोटी ७५ लाख हज यात्रेकरू यामुळे प्रभावित होतील. २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयाअंतर्गत हज सबसिडी हळूहळू २०२२ पर्यंत संपुष्टात आणण्याचे आदेश दिले होते.

* सरकारने २०१३ साली ६८० कोटी, २०१४ साली ५७७ कोटी, २०१५ साली ५२९ कोटी, २०१६ साली ४०५ कोटी अनुदान हज यात्रेसाठी दिले होते.

* २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सबसिडी बंद करण्याचे आदेश दिले होते. आता सरकार हा निधी मुस्लिम मुलीच्या शिक्षणावर खर्च करण्याची घोषणा करत आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.