बुधवार, २४ जानेवारी, २०१८

रोजगारविषयक आयएलओ जागतिक अहवाल २०१८ - २३ जानेवारी २०१८

रोजगारविषयक आयएलओ जागतिक अहवाल २०१८ - २३ जानेवारी २०१८

* जगभरातील रोजगारवाढीचा रोख व सामाजिक स्थिती याविषयीचा 'वर्ल्ड एम्प्लोमेन्ट अँड सोशल आउटलूक : ट्रेंड्स २०१८ हा अहवाल आयएलओ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला.

* गेल्या वर्षी अहवालात या संस्थेने २०१७ व २०१८ मध्ये भारतातील बेरोजगारीचे प्रमाण ३.४ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता.

* ताज्या अहवालात २०१८ चा अंदाज सुधारित करण्यात करण्यात आला आहे. अपेक्षेहून बेरोजगारीचे प्रमाण वाढून ३.५ एवढे राहील असे त्यात म्हटले आहे. त्यात २०१९ साठीही बेरोजगारीचे प्रमाण ३.५% एवढे राहील असे सांगण्यात आले आहे.

* अहवालानुसार तीन वर्षात प्रथमच जागतिक पातळीवर बेरोजगारीचे प्रमाण यंदा थोडेसे कमी ५.६ वरून ५.५% होण्याचा अंदाज आहे. मात्र रोजगार बाजारात अधिक संख्येने लोक येत असल्याने बेरोजगारांचा आकडा कमी न होता १९२ दशलक्ष होईल.

* म्हणजेच आयएलओ च्या म्हणण्यानुसार आगामी दोन वर्षात भारतातील बेरोजगारी कमी होण्याची चिन्हे नाहीत. आकड्यांच्या भाषेत २०१८ मध्ये भारतातील बेरोजगारी १७.८ दशलक्ष वरून १८.६ दशलक्ष एवढी होईल.

* मोदी सरकार सन २०१४ मध्ये सत्तेवर आल्यासपासून बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे या अहवालातून दिसते. मोदी सरकार येण्याआधी २०१३ मध्ये भारतातील बेरोजगारीचे प्रमाण ३.६% होता. तो थोडा कमी होऊन ३.४ टक्के झाला. तर सध्या तो ३.५ स्थिर आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.