शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

राज्यात ३६ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यात कायमस्वरूपी हेलिपॅड - २७ जानेवारी २०१८

राज्यात ३६ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यात कायमस्वरूपी हेलिपॅड - २७ जानेवारी २०१८

* राज्य शासनाने आता हेलिपॅड धोरण जाहीर केले असून यात राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यात कायमस्वरूपी हेलिपॅड बांधले जाणार आहे.

* या नवीन धोरणामुळे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव कोठेही, तसेच सभेच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यावर बंधने येणार आहेत.

* मुख्यमंत्र्यांच्या हेलीकॉप्टरला तीन ते चार वेळेस अपघात झाले आहेत. हे अपघात हेलिकॉप्टरमधील बिघाडासोबतच हेलिपॅड व्यवस्थित नसल्यामुळेही झाले आहेत. हे सर्व लक्षात आल्यानंतर शासनाने गुरुवारी नवीन हेलिपॅड धोरण जाहीर केले आहे.

* जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी हेलिपॅड करावे असे आदेश दिले आहेत. या हेलिपॅडचा आकार ५२ बाय ५२ चौरस मीटर असणार आहे.

* हेलिपॅडपासून २४५ मीटर लांबीच्या परिसरात ३५ मीटर उंचीचे कोणतेही बांधकाम तसेच हवाई अडथळा काही असू नयेत याची खबरदारी घेतली जाणार आहे.

* राज्यात सध्या अधिकृत ५१ तात्पुरते हेलिपॅड आहेत. त्यांनाही आता या नवीन धोरणाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.