सोमवार, १५ जानेवारी, २०१८

काही नवीन चालू घडामोडी ११ ते १५ जानेवारी - २०१८

काही नवीन चालू घडामोडी ११ ते १५ जानेवारी - २०१८

* इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले. दिल्ली विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांचे स्वागत केले.

* जागतिक उत्पादन निर्देशांकात जागतिक आर्थिक मंचाने [वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम] १०० देशांच्या यादीत भारताला ३० वे स्थान दिले आहे.

* आतापर्यंत जपल्या गेलेल्या न्यायालयीन शिष्टाचाराच्या चौकटीला छेद देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायमूर्तीनी संयुक्त पत्रकात परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले.

* भारताच्या आंचल ठाकूरने तुर्कीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एल्पाईन एजदार ३२०० स्किईंग स्पर्धेत कास्य पदकाची कमाई केली आहे.

* ब्रिटनमध्ये निवडून आलेल्या मूळ भारतीय वंशाचे खासदारना पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

* आधार कार्डधारकांसाठी गोपनीयता अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन टू-लेयर सेफटी सिस्टीम जारी केली आहे. ही टू लेयर म्हणजे व्हर्चुअल आयडी आणि लिमिटेड केवायसी होय.

* २०१८ मध्ये भारताचा विकासदर ७.३ टक्क्यावर असेल. असा अंदाज जागतिक बँकेने २०१८ ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट या अहवालात वर्तविला आहे.

* दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार दरवर्षी ७७ हजार ज्येष्ठ नागरिकांना [६० वर्षाहून अधिक वय] मोफत तीर्थयात्रेची सुविधा देणार आहे.

* थेट जनतेतून निवडून आलेल्या नागराध्यक्षावर अडीच वर्षापर्यंत अविश्वास ठराव आणता येणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

* 'ओल्ड मॉक' या रमला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचविणारे पदमश्री ब्रिगेडियर निवृत्त कपिल मोहन यांचे ६ जानेवारी रोजी गाझियाबाद येथे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले.

* भारतातून जाणाऱ्या हजयात्रेकरुसाठी स्वस्तातील समुद्रमार्ग उपलब्द करून देण्याच्या भारत सरकारच्या मागणीला सौदी अरेबियाने मान्यता दिली आहे.

* लगान चित्रपटामध्ये 'ईश्वर काका' ची भूमिका साकारणारे अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचे ७ जानेवारी रोजी जयपूर येथे निधन झाले. ते ६० वर्षाचे होते.

* जगातील अव्वल टॉप ३ नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला आहे. पहिल्या क्रमांकावर जर्मनच्या चॅन्सलर अँजेला मर्केल, दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांचे नाव आहे.

* आईसलँड स्त्री-पुरुष यांना समान वेतन द्यावा असा सक्तीचा कायदा करण्यात आला आहे. हा कायदा लागू करणारे हे जगातील पहिले राष्ट्र ठरले.

* टी एस तिरुमूर्ती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिव [आर्थिक संबंध] पदी नियुक्त करण्यात आले आहे.

* भारतीय फलंदाज विराट कोहली हा इंडियन प्रीमिअर लीग [IPL] च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. विराटसाठी रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने संघात कायम ठेवण्यासाठी १७ कोटी रुपये मोजावे लागले.

* जगातील सर्वात मोठ्या आईस फेस्टिवलला उत्तरपूर्व चीनच्या हार्बीन शहरात सुरुवात झाली आहे. येत्या महिन्यात हजारो पर्यटकांना हे फेस्टिवल आकर्षित करण्याची अपेक्षा केली जात आहे.

* जागतिक व्यापार संघटना [WTO] चे माजी महासंचालक आणि गोल्डमॅन सॅक्सचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पीटर स्युदरलँड यांचे निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते.

* पुण्यामध्ये भारताचा पहिला मल्टी-पेटाफ्लॉप सुपरकॉम्पुटर 'प्रत्युष' राष्ट्राला समर्पित करण्यात आला आहे. यामुळे अचूक हवामान अंदाज मिळण्यास मदत होईल.

* प्रसिद्ध बांगला अभिनेता सौमित्र चट्टोपाध्याय यांना फ्रान्स सरकारकडून 'लीजन ऑफ ऑनर' पुरस्कार घोषित झाला आहे. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

* प्रसिद्ध गायक व संगीतकार ए आर रहमान यांना सिक्कीमचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले गेले आहे. ही नियुक्ती एका वर्षासाठी आहे.

* सिंगापूरस्थित भारतीय वंशाचे उद्योजक सनी वर्गीज यांची जिनेव्हास्थित वर्ल्ड बिझिनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट [WBCSD] चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली आहे.

* ११ जानेवारी २०१८ रोजी बिहारचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बिहारच्या राजगीर शहरात चौथ्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे उदघाटन करण्यात आले आहे.

* अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस हे १०५.१ अब्जच्या संपत्तीसह संपूर्ण इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

* सरजूबाला देवी हिने 'राष्ट्रीय महिला मुष्टीयुद्ध विजेतेगटात -२०१८ स्पर्धेच्या ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.