बुधवार, ३ जानेवारी, २०१८

नवीन १० रुपयाची नोट येणार - ३ डिसेंबर २०१७

नवीन १० रुपयाची नोट येणार - ३ डिसेंबर २०१७

* नव्या ५० आणि दोनशेच्या नोटेनंतर आता दहा रुपयाची नवी नोट बाजारात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच दहाची नोट जारी करणार आहे.

* महात्मा गांधी सिरींजमधील नवी नोट तपकिरी रंगाची असेल. आरबीआयने १० रुपयाच्या कोट्यवधी नोटांची छपाई सुरूही केली आहे.

* गेल्याच आठवड्यात या नोटेच डिझाईन निश्चित झालं होत. त्यानंतर आता तिची छपाईही सुरु झाली आहे. यापूर्वी २००५ मध्ये दहाच्या नोटेत बदल करण्यात आला होता.

* त्यानंतर जवळपास १३ वर्षांनी पुन्हा या नोटेची रचना बदलण्यात येत आहे. आरबीआयने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात महात्मा गांधी सीरिजमधील २०० आणि ५० रुपयाची नोट जारी केली होती.

* त्यानंतर आता नवी दहाची नोट येणार आहे. नव्या दहाची नोट तपकिरी रंगाची असेल. या नोटेवर कोणार्क सूर्य मंदिराच चित्र असेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.