सोमवार, २९ जानेवारी, २०१८

राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे - ३० जानेवारी २०१८

राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे - ३० जानेवारी २०१८

* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिले अभिभाषण काल पार पडले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या निमित्ताने लाल गालिच्यांची व फुलांच्या आकर्षक सजावटीने सजलेल्या ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे प्रतिबिंब आज पडले होते. 

* अभिभाषणातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे 

* 'बेटी बचाओ बेटी पढाव' योजनेची व्याप्ती १६१ वरून ६४० जिल्ह्यावर नेण्यात आली. 
*  महिलांना प्रसूती रजेचा कालावधी १२ वरून २६ आठवड्यापर्यंत वाढविला.
* जन-धन-योजनेत ३१ नवीन बँक खाती उघडण्यात आली.
* शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुपटीने वाढविणार.
* देशभरातील बाजारपेठा ऑनलाईन जोडण्याचे काम वेगाने सुरु.
* अनेक दशकापासून प्रलंबित असलेल्या ९९ सिंचन योजना मार्गी लागल्या आहेत.
* रस्त्याने जोडलेल्या गावांची टक्केवारी ८२ टक्क्यावर पोचली. २०२२ पर्यंत प्रत्येक गावात रस्ता होणार.
* मुद्रा योजनेच्या माध्यमातून १० लाख लोकांना कर्ज मंजूर करण्यात आले.
* हज यात्रेसाठी मुस्लिम महिलांवरील बंधने हटविली.
* गेल्या साडेतीन वर्षात गरिबांसाठी ९३ लाखाहून जास्त घरांची निर्मिती केली.
* प्रधानमंत्री जन औषधी केंद्राद्वारे ८०० हुन जास्त उपकेंद्रे उघडली.
* अवकाश संशोधन क्षेत्रातील यश उल्लेखनीय.
* भारतमाला या रस्ते बांधणीसाठी साडेपाच लाख कोटींचा निधी मंजूर, गंगा नदीतून जलवाहतुकीसाठी पूर्वतयारी वेगात.
* तीन प्रमुख बंदरावर स्मार्ट पोर्ट औद्योगिक शहरांची निर्मिती सुरु. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.