गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

जगातील सर्वात वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती विकसित - ४ डिसेंबर २०१७

जगातील सर्वात वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती विकसित - ४ डिसेंबर २०१७

* नासा या अमेरिकी अवकाश संस्थेच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी जगातील सर्वात वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती विकसित केली आहे.

* या विकासामुळे गव्हाचे उत्पादन वाढणार आहे. नासाच्या प्रयोगात सतत सूर्यप्रकाशात रोपे राहतात. यात रोपांची वाढ खूप झपाट्याने होते.

* ऑस्ट्रेयीयातील क्वीन्सलँड विद्यापीठातील ली हिकी या संशोधकांने सांगितले. की जलद वाढ तंत्र वापरताना त्यात गहू, चवळी, व बार्ली यांची सहा पिढ्यातील रोपे तर कॅनॉलाची चार पिढ्यातील रोपे एका वर्षात वाढवण्यात आली.

* यात विशिष्ट प्रकारचे काचगृह वापरण्यात आले होते. नियंत्रित वातावरणात वाढवण्यात आली. नियंत्रित वातावरणात वाढवण्यात आलेल्या प्रयोगात सूर्यप्रकाश भरपूर ठेवला होता.

* २०५० पर्यंत जगात अन्नधान्य उत्पादनात ६० ते ८०% वाढ केली. तरच लोकांना अन्न मिळू शकणार आहे. त्यामुळे उत्पादन वाढीच्या या प्रयोगाला महत्व आहे. २०५० पर्यंत जागतील लोकसंख्या ९ अब्ज असणार आहे.

* अधिक वेगाने वनस्पतीची वाढ करण्याचे प्रयोग हे संशोधनात केले जात होते. ते आता प्रत्यक्ष वापरात आणण्याची वेळ आली आहे.

* डो ऍग्रोसायन्स बरोबर भागीदारीत हे तंत्र वापरून गव्हाची डीएस फॅरेडे ही नवी प्रजाती विकसित करण्यात आली असून ती याच वर्षी वितरित होणार आहे.

* डीएस फॅरेडे ही जास्त प्रथिने असणारी गव्हाची प्रजाती असून त्यात लवकर अंकुरण होते. या गव्हात काही जनुके समाविष्ट करण्यात आली असून, त्यामुळे ही प्रजाती जास्त ओलसर हवामानातही टीकते.

* ऑस्ट्रेलियात गेली ४० वर्षे ही समस्या सोडण्याचे प्रयत्न चालू होते. पीएचडी च्या विद्यार्थ्यांनी अनेक फलोद्यान व उर्ध्व शेती पद्धतीतही या तंत्राचा वापर होणार आहे.

* ही डीएस फॅरेडे गहू प्रजात जास्त प्रथिने, वेगाने वाढ, ओलसर हवामानातही टिकण्याची क्षमता, गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.