शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

प्रसिद्ध सरोद वादक बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन - १९ जानेवारी २०१८

प्रसिद्ध सरोद वादक बुद्धदेव दासगुप्ता यांचे निधन - १९ जानेवारी २०१८

* पदमभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध सरोद वादक पंडित बुद्धदेव दासगुप्ता यांचे १५ जानेवारी रोजी निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते.

* बुद्धदेव दासगुप्ता यांचा जन्म १ फेब्रुवारी १९३३ रोजी बिहारमधील भागलपूर येथे झाला. घरातील संगीतमय वातावरणामुळे त्यांनाही सुरवातीपासून संगीताची रुची निर्माण झाली.

* त्यांनी सरोद उस्ताद संगीताचार्य राधिका मोहन मित्र यांच्याकडून सरोद वादनाचे धडे घेतले. घराण्याच्या परंपरेतून राहून वेगळी वाट चोखाळणारे सरोदिये म्हणून त्यांची वेगळी वाट चोखाळणारे आहेत.

* संगीत प्रभाकर आणि संगीत प्रवीण या पदव्या त्यांना मिळाल्या. आकाशवाणीवरील एक नामांकित वादक म्हणून त्यांना मान्यता मिळाली.

* संगीत नाटक अकादमी, शिरोमणी पारितोषिक, अल्लाउद्दीन पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्काराबरोबर २०१२ साली भारत सरकारचा पदमभूषण हा किताबही त्यांना मिळाला.

* त्यांच्या जीवनावर आधारित बामनेर चंद्रस्पर्शविलास हे पुस्तक प्रकाशित झाले. २००४ मध्ये हे पुस्तक बंगाली आत्मकथामध्ये सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले.

* सरोद वादनातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल २०११ मध्ये त्यांनी पदमश्री किताब प्रदान करण्यात आला. परंतु दासगुप्ता यांनी तो नाकारला.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.