सोमवार, २२ जानेवारी, २०१८

भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे देशातील ७३% संपत्ती - २२ जानेवारी २०१८

भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे देशातील ७३% संपत्ती - २२ जानेवारी २०१८

* भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे देशातील ७३% संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. तर ६७ कोटी भारतीयांच्या संपत्तीकडे फक्त एक टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. 

* दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॉम या संस्थेचा [रिवॉर्ड वर्क नॉट वेल्थ] हा अहवाल रविवारी प्रसिद्ध झाला. 

* देशातील आणि जागतिक पातळीवरील आर्थिक विषमता या अहवालातून समोर येते. जागतिक पातळीवर गेल्या वर्षभरात तयार झालेल्या एकूण संपत्तीतील ८२% वाटा हा १% लोकांकडे गेला. 

* ३ अब्ज ७० लाख लोकांच्या संपत्तीमध्ये काहीच वाढ झालेली नाही. भारतातही फार वेगळे चित्र नाही. भारतातील एक टक्का श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये जवळपास २०.९ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली. 

* जगातील १० देशातील सुमारे ७० हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सीईओच्या पगारात कपात करावी असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६०% लोकांना वाटते. 

* भारतातील ३७ टक्के अब्जाधीशाकडे वारसाहक्काने संपत्ती आल्याचे अहवालातून समोर येते. ऑक्सफॅमच्या भारतातील सीईओ निशा अग्रवाल यांनी या अहवालावर चिंता व्यक्त केली आहे. 

* केंद्र सरकारडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक सोईसुविधा लाभ मूठभर लोकांपर्यंतच पोहोचत असल्याचे यानिमित्ताने दिसते. अब्जाधीशांची वाढती संख्या हे चांगल्या अर्थव्यवस्थेचे लक्षण नाही. 

* तर ढासळत्या अर्थव्यवस्थेचे लक्ष आहे. एकीकडे बांधकाम साईटवर काम करणारे मजूर, शेतमजूर, कंपनीत काम करणारे यांच्याकडे मुलांच्या शिक्षणासाठी, औषधाच्यासाठी खरेदीसाठी पैसे नाहीत. 

* भारतात ४ अब्ज महिला अब्जाधीश असून यातील तीन जणांकडे वारसाहक्काने संपत्ती आली आहे. त्यांच्याकडे एकूण १० हजार ५४४ अब्ज रुपये इतकी संपत्ती आहे. भारतात अब्जाधीशांच्या संपत्तीत २०१० पासून सरासरी १३ टक्के या वेगाने भर पडत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.