शनिवार, २७ जानेवारी, २०१८

हिंदी वर्ड ऑफ द ईअर म्हणून 'आधार' शब्दाला मान - २८ जानेवारी २०१७

हिंदी वर्ड ऑफ द ईअर म्हणून 'आधार' शब्दाला मान - २८ जानेवारी २०१७

* जगप्रसिद्ध इंग्रजी अर्थात ऑक्सफर्ड डिक्शनरी दरवर्षी 'इंग्रजी वर्ड ऑफ द ईअर' घोषित करते. त्याचप्रमाणे ऑक्सफर्डने यंदा पहिल्यांदाच हिंदी वर्ड ऑफ द ईअर म्हणून २०१७ सालासाठी हा मान 'आधार' या शब्दाला मिळाला आहे.

* राजस्थानमध्ये सुरु असलेल्या जयपूर साहित्य संमेलनात [जेएलएफ़] शनिवारी ऑक्सफर्ड डिक्शनरीकडून ही घोषणा करण्यात आली. यावेळी जगभरातील अनेक दिग्गज साहित्यिक आणि पत्रकार उपस्थित होते.

* दरम्यान ऑक्सफर्डतर्फे सांगण्यात आले की वर्षातील हिंदी शब्दाची निवड करणे सोपे नव्हते. यासाठी अनेक शब्दावर विचार सुरु होता. निवड समितीसमोर नोटबंदी, स्वच्छ, आधार, योग, विकास, बाहुबली असे अनेक पर्याय होते.

* अखेर यामधून आधार या शब्दाची निवड करण्यात आली. गेल्या वर्षी सर्वात जास्त चर्चा झालेला आणि जनतेने लक्ष वेधून घेणाऱ्या शब्दांचीच निवड समितीने निवड केली.

* वर्षातला हिंदी शब्द ठरलेला आधार हा असा शब्द आहे, ज्याने गेल्या १२ महिन्यात वारंवार लोकांना आकर्षित केले आहे. आमचे विशेष पॅनल संबंधित वर्षातील अशा शब्दांचा विचार करतात. जो शब्द त्या वर्षातील लोकांचे आचरण, भावना, आणि पूर्वग्रहांचे प्रतिबिंब या शब्दात असते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.