शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक व सुरक्षा मदत - ५ जानेवारी २०१८

अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक व सुरक्षा मदत - ५ जानेवारी २०१८

* काही दिवसापूर्वीच पाकिस्तानला आर्थिक मदत न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने पाकला आणखी एक धक्का दिला आहे.

* पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनाविरोधात ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरविण्यात येणारी सुरक्षा मदत थांबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली.

* त्यांनी म्हटले की पाकिस्तान जोपर्यंत तालिबानी दहशतवादी संघटना, हक्कानी नेटवर्क यासारख्या अशांतता पसरवणाऱ्या आणि अमेरिकन लोकांना इजा पोहोचवणाऱ्या घटकाविरोधात निर्णायक कारवाई करणार नाही.

* तोपर्यंत अमेरिका पाकला कोणतेही सुरक्षा साहाय्य पुरवणार नाही. या अंतर्गत ट्रम्प सरकार पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवू शकते.

* मात्र रक्कम सरकारला अन्य ठिकाणी वळवता येणार नाही. जेणेकरून परिस्थिती सुधारल्यानंतर या निधीचा पुन्हा वापर करता येईल. असे हीथर नोर्ट यांनी सांगितले.

* गेल्या १५ वर्षांमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलरच सहाय्य केलं असून तो मूर्खपणा होता. असं ट्रम्प यांनी म्हटलं होत.

* अफगाणिस्तानमध्ये आम्ही शोधत असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देत होता. असा आरोप ट्रम्प यांनी पाकिस्तानवर लावला.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.