शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

पदम पुरस्काराची घोषणा - २७ जानेवारी २०१८

पदम पुरस्काराची घोषणा - २७ जानेवारी २०१८

* विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या पदम पुरस्काराची आज गुरुवार घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील डॉ अभय बंग, राणी बंग, यांना आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी पदमश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.

* संगीतकार इलाई राजा आणि गुलाम मुस्तफा खान पदमविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि बिलिडियर्सपटू पंकज अडवाणी यांची पदमभूषण निवड करण्यात आली आहे.

* याशिवाय साहित्य क्षेत्रात बहुमूल्य कार्याबद्दल अरविंद गुप्ता, क्रीडाजगतात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्रातील मुरलीकांत पेटकर आणि विजयालक्ष्मी नवनीत कृष्ण यांनाही पदमश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर संपत रामटेके यांना मरणोत्तर पदमश्री जाहीर करण्यात आला आहे.

* केंद्र सरकारकडून पदमविभूषण, पदमभूषण आणि पदमश्री पुरस्काराची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी १५,७०० लोकांनी अर्ज केला होता.

* मध्य प्रदेशातील भज्जू श्याम, केरळच्या लक्ष्मी कुट्टी, पश्चिम बंगालच्या सुधांशु बिस्वास, केरळच्या एमआर राजगोपाल यांनाही पदमश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

* कला, साहित्य, शिक्षा, खेळ, चिकित्सा आणि सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.