सोमवार, २९ जानेवारी, २०१८

भर्तृहारी मेहताब यांना २०१७ चा संसदीय पुरस्कार जाहीर - ३० जानेवारी २०१८

भर्तृहारी मेहताब यांना २०१७ चा संसदीय पुरस्कार जाहीर - ३० जानेवारी २०१८

* भारतीय संसदीय गटाने [इंडियन पार्लिमेंटरी ग्रुप] तब्बल ५ वर्षांनी संसदेत भरीव कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्याचे ठरविले असून डॉ नजमा हेपतुल्ला यांची राज्यसभेतील कार्यासाठी [सन २०१३] च्या साठी निवड करण्यात आली आहे.

* तसेच भाजपचे हुकूमदेव नारायण यादव यांची लोकसभेतील कार्यासाठी [सन २०१४] निवड झाली आहे. तसेच राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांची २०१५ सालच्या पुरस्कारासाठी निवड झाली.

* तृणमूल काँग्रेसचे सदस्य दिनेश त्रिवेदी [लोकसभा] यांची २०१६ सालच्या पुरस्कारासाठी तर भर्तृहारी मेहताब यांना २०१७ चा संसदीय पुरस्कार जाहीर करण्यात आला.

* हे संसदीय पुरस्कार १९९५ साली सुरु करण्यात आले होते आणि पहिला पुरस्कार माजी पंत्रप्रधान स्व. चंद्रशेखर यांना, तर त्यानंतरच्या वर्षात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी व माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.