बुधवार, १७ जानेवारी, २०१८

ब्राझीलचा रोनाल्डिनो फुटबॉल संघातून निवृत्त - १८ जानेवारी २०१८

ब्राझीलचा रोनाल्डिनो फुटबॉल संघातून निवृत्त - १८ जानेवारी २०१८

* ब्राझीलचा विश्वचषक विजेत्या संघातील फुटबॉलपटू रोनाल्डिनोने बुधवारी अधिकृत निवृत्ती जाहीर केली आहे. ३७ वर्षीय रोनाल्डिनो हा गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय फुटबॉलपासून दूर आहे.

* रोनाल्डिनोचा बंधू आणि समन्वयक रॉबर्टरे असीसने त्याच्या निवृत्तीबाबत माहिती देताना सांगितले की रोनाल्डिनो यापुढे आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणार नाही.

* निवृत्तीनंतर फुटबॉलसाठी खूप काही करण्याची त्याची इच्छा आहे. रोनाल्डिनो १९९९ ते २०१३ या कालावधीमध्ये ९७ सामन्यांमध्ये ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना ३३ गोल केले.

* २००२ च्या विश्वचषकात स्पर्धेतील विजेत्या संघात त्याचा समावेश होता. त्या स्पर्धेत रोनाल्डिनोने दोन गोल केले होते.

* आंतरराष्ट्रीय क्लब कारकीर्द ग्रॅमिओपासून सुरु करणाऱ्या रोनाल्डिनोने २००३-०८ या पाच वर्षात बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व केले. याच काळामध्ये २००५ मध्ये रोनाल्डिनो प्रतिष्ठेच्या 'बॅलन डी ऑर' पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.