गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

आज देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन व काही खास वैशिष्ट्ये - २६ जानेवारी २०१८

आज देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन व काही खास वैशिष्ट्ये - २६ जानेवारी २०१८

* देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होणार आहे. राजधानी दिल्लीतल्या राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याच, सांस्कृतिक विविधतेच दर्शन घडवणारी परेड हे या दिवसाचं मुख्य आकर्षण असतं.

* ही देखणी परेड याची देही, याचि डोळा पाहण्यासाठी देशभरातले अनेक लोक या दिवशी दिल्लीत दाखल होत असतात. भारतीय प्रजासत्ताकाच्या वैभवाच्या दर्शन संपूर्ण जगाला घडवणाऱ्या या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये यंदा काय खास गोष्टी आहेत हे पाहू.

१] दरवर्षी २६ जानेवारीला एका देशाचे राष्ट्रप्रमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतात. यंदा पहिल्यांदाच एकाचवेळी १० राष्ट्रांच्या प्रमुखांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. भारत आसियान राष्ट्रांच्या संबंधाला २५ वर्षे पूर्ण होतायत त्यानिमित्तानं आसियान मधील थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस, ब्रुनेई, या दहा देशांचे प्रमुख या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याच्यासाठी १०० फूट लांब बुलेटप्रूफ काच उभारली जाणार आहे.

२] राजपथावर डेअर डेव्हील्सच्या बाईकवरच्या कसरती दरवर्षी श्वास रोखून धरायला लावणाऱ्या आहेत. यंदा पहिल्यांदाच बीएसएफच्या महिला जवानाचं पथक या बाइकवरच्या कसरती दाखवणार आहेत. सीमा भवानी [बॉर्डर ब्रेव्हज] असं या पथकाला नाव देण्यात आले आहे. रॉयल इनफिल्ड बुलेटवरून दाखल होऊन २७ महिला जवानाचं पथक यंदा १६ प्रकारच्या चित्तरथक कसरती दाखवणार आहे. ज्यात पिरॅमिड, फिश रायडींग, शक्तिमान फायटिंग, अशा गोष्टीचा समावेश असणार आहे.

३] दरवर्षी राजपथावर ते ठुमकत, लचकत ऐटीत दाखल झाले की टाळ्यांचा सर्वाधिक पाऊस पडतो. बीएसएफच्या नखशिकांत सजवलेल्या उंटाचं पथक याही वर्षी परेडच मुख्य आकर्षण असणार आहे. त्यांच्यासोबत ५१ घोडेस्वाराचं पथकही जोडण्यात आलं आहे.

४] राजपथावर जे सांस्कृतिक चित्ररथ सादर होतात. त्यात पहिल्यांदाच ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा चित्ररथ सादर होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या मन की बात च प्रदर्शन यातून होणार आहे.

५] केंद्र सरकारच्या खात्यांचे जे विविध चित्ररथ सादर होत असतात. त्यात यावेळी पहिल्यांदाच आयकर विभागाचा चित्ररथ समाविष्ट करण्यात आला आहे. नोटबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात उचलेल्या अभियानाची माहिती या चित्ररथातून दिली जाणार आहे.

६] परेडच्या शेवटी आकाशातून चित्तरथक कसरती करत भारतीय हवाई दलाची विमानं राष्ट्रध्वजाला अनोखी मानवंदना देत असतात. याला फ्लाय पास्ट असं म्हणतात मागच्या वर्षी ३५ विमान या फ्लाय पास्टमध्ये सहभागी होती. यंदा या विमानाची संख्या वाढवून ३८ करण्यात आली आहे. लष्कराच्या ध्रुव हेलिकॉप्टर कसरती यंदा दिसणार आहेत.

७] आय इन द स्काय अशी ओळख असलेलं भारतीय हवाईदलाच्या निगराणी पथकाची शान असलेलं नेत्र हे उपकरण यंदा पहिल्यांदाच राजपथाच्या आकाशात घोंगावताना दिसेल.

८] भारत-आसियान संबंधाचा इतिहास सांगणारे दोन चित्ररथ यंदाच्या परेडमध्ये सामील करण्यात आले आहेत. कंबोडिया, मलेशिया, थायलँड, या देशातल्या कथ्थक आणि इतर लोककलाच मनोहारी दृश्य त्यानिमित्त पाहायला मिळणार आहे.

९] डीआरडीओ ने नुकतेच विकसित केलेल्या निर्भय या क्षेपणास्त्राची आणि अश्विनी या रडार उपकरणांची पहिली झलक यंदा राजपथावर पाहायला मिळणार आहे.

१०] महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकाचा सोहळा सादर करण्यात आला आह.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.