रविवार, २८ जानेवारी, २०१८

२०१८ संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु - २९ जानेवारी २०१८

२०१८ संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु - २९ जानेवारी २०१८

* संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सोमवारपासून सुरु होत आहे. गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील.

* अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत रविवारी केंद्र सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनात तिहेरी तलाकबंदी विधेयक संमत करण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले.

* या विधेयकाच्या मंजुरीसाठी एकमत साधण्याचा केंद्र सरकार आटोकाट प्रयत्न करेल, असे संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले.

* तसेच अर्थसंकल्पाआधीचा केंद्र सरकारचा महत्वाचा उपक्रम म्हणजे आर्थिक सर्वेक्षण सादर करणे यंदा, केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी मांडण्यात येणार आहे. तर आर्थिक सर्वेक्षण अहवाल मात्र सोमवारीच सभागृहात मांडण्यात येणार आहे.

* यात गेल्या वर्षभरातील आर्थिक कामगिरीचा आढावा या अहवालात घेतला जातो. विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी कशा प्रकारे झाली. धोरणे कशा प्रकारे राबविली गेली आणि अर्थव्यवस्थेची वाटचाल कोणत्या वळणावर सुरु आहे, आदी बाबीचा परामर्श घेतला जातो.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.