सोमवार, २२ जानेवारी, २०१८

जगातिक उद्योग गुंवणूकीत भारत ५ व्या स्थानी - २२ जानेवारी २०१८

जगातिक उद्योग गुंवणूकीत भारत ५ व्या स्थानी - २२ जानेवारी २०१८

* भारतातील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच जगातील टॉप कंपन्यांच्या सीईओचा एक अहवाल समोर आला आहे. 

* जगात गुंतवणुकीसाठी आकर्षक देशांची यादी तयार करण्यात आली असून या यादीत भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. भारताने जपानला मागे टाकले असून या यादीत अमेरिकेने पहिले स्थान पटकावले आहे. 

* [प्राईसवॉटर हाऊस कूपर्स] या संस्थेने एक अहवाल तयार केला असून जगभरातील टॉप कंपन्यांच्या सीईओची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. 

* जगातील परदेशी गुंतवणुकीसाठी फेव्हरेड डेस्टिनेशन कोणते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या यादीत पहिल्या स्थानी अमेरिका आहे.

* अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी अनेक सीईओनी पसंती दर्शविली आहे. चीन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर युरोप चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानी आहे. या यादीत भारताने जपानला मागे टाकले आहे. 

* भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. भारत उद्योगस्नेही देश असल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जात आहे. 

* दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येही [मेक इन इंडिया] चा प्रसार केला जाणार आहे. मोदी या परिषदेत भारतीय भारतीय अर्थव्यवस्थेत लेखाजोखा मांडणार आहेत. 

* नोटबंदी आणि वस्तू व सेवा कर या काहीसे अयशस्वी मानले जाणाऱ्या पावलांचे समर्थन ते यावेळी करण्याची शक्यता आहे. या पार्शवभूमीवर हा अहवाल समोर आला आहे. 

* आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही [आयएमएफ] खुशखबर दिली असून या वर्षी म्हणजे सन २०१८-१९ मध्ये भारताचा विकासदर ७.४ टक्के राहील. असे भाकीत या वित्तीय संस्थेने केले आहे. 

* त्या तुलनेत चीनच्या अर्थव्यस्थेची गती ६.८% राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोटबंदी आणि वस्तू व सेवा कारप्रणालीची अंमलबजावणी या दोन प्रमुख कारणामुळे विकासदर तुलनेत कमी होऊन ६.७ टक्क्यावर आला होता. २०१९-२० मध्ये विकासाचा वेग ७.८ टक्क्याच्या आसपास राहील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.