सोमवार, २२ जानेवारी, २०१८

४८ वी जागतिक आर्थिक फोरम परिषदेसाठी नरेंद्र मोदीजी रवाना - २२ जानेवारी २०१८

४८ वी जागतिक आर्थिक फोरम परिषदेसाठी नरेंद्र मोदीजी रवाना  - २२ जानेवारी २०१८

* जागतिक आर्थिक विकासाचे व एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेचे भारत हेच इंजिन आहे. असा विषय मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १३० सदस्यांचे भव्य शिष्टमंडळ सोमवारी दावोसला [स्वित्झर्लंड] रवाना होत आहे.

* जागतिक आर्थिक फोरमची [WEF] ४८ वी बैठक आल्प्स गिरिशिखराच्या कुशीत वसलेल्या दावोसमधील एका रिसॉर्टमध्ये होत आहे.

* WEF चे अध्यक्ष क्लाउस श्वाब हे सोमवारी त्याचे उदघाटन करतील. मात्र पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेत पंतप्रधान मंगळवारी विषय मांडतील.

* त्याआधी सोमवारी सकाळी ६ केंद्रीय मंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन डाव्होसला रवाना होत आहेत. सोमवारी रात्रीच पंतप्रधान मोदी यांनी विदेशातील ४० कंपन्यांचे सीईओ आणि अध्यक्षसाठी विशेष सभा आहे.

* मंगळवारी होणाऱ्या मुख्य भाषणात हे तरुण व आधुनिक भारताचे चित्र मांडणार आहेत. भारतातील उदयोन्मुख वातावरणासाठी उचलण्यात आलेली पावले.

* भ्रष्टाचारावर आणलेला आळा, काळया पैशाविरुद्ध मोहीम, कर संरचनेचे सुलभीकरण व यामार्फत विकासाला
मिळणारी गती, हा विषय पंतप्रधान मोदी मांडतील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

* या परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख आणि उद्योजकांसह जगभरातील ३ हजाराहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.  मात्र मोदी व ट्रम्पही सहभागी होणार आहेत.

* मात्र मोदी व ट्रम्प हे वेगवेगळ्या दिवशी दावोसमध्ये असल्याने त्यांची भेट होणार नाही. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासही दाखल होणार आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांची त्यांच्यासोबत कुठलीही बैठक होणार नाही.

* मात्र मोदी हे स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलेन बेरसेत यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.