मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

हृतिक रोशन जगातील सर्वात हॅण्डसम अभिनेता - १६ जानेवारी २०१८

हृतिक रोशन जगातील सर्वात हॅण्डसम अभिनेता - १६ जानेवारी २०१८

* दरवर्षी बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रेटीमध्ये सर्वाधिक मानधन, सर्वाधिक मादक अभिनेता-अभिनेत्री, सामाजिक कार्यात हातभार लावणारे सेलिब्रेटी अशा विविध विभागाच्या यादी प्रसिद्ध केल्या जातात.

* अशाच एका यादीत बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने बाजी मारली आहे. बॉलिवूडमध्ये फक्त अभिनेत्रींच्या सौन्दर्याचा गाजावाजा असतो असे नाही. तर काही अभिनेत्याच्या लूकवरही चाहत्यांची नजर खिळते.

* अशाच अभिनेत्यामध्ये येणारे एक नाव म्हणजे हृतिक रोशन, ग्रीक गॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतिकच्या लूकची चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर जागतिक कलाविश्वातही झाल्याचे पाहायला मिळते.

* कारण worldstopmost.com या प्रसिद्ध वेबसाईटने केलेल्या यादीवर नजर टाकली असता या यादीत हृतिक अग्रस्थानी असल्याचे लक्षात येते.

* हृतिकने सर्वाधिक सुंदर पुरुषाच्या यादीत रॉबर्ट पॅटिसन्स, क्रिस इवास, टॉम हिंडलस्टन, या प्रसिद्ध अभिनेत्यांना मागे टाकले आहे.

* हृतिक व्यतिरिक्त अभिनेता सलमान खानलाही या यादीत ५ वे स्थान मिळाले आहे. त्याशिवाय यादीत हेनरी कवील, नुह मिल्स या कलाकाराच्या नावाचा समावेश आहे.

* रुपेरी पडदयावर विविध भूमिका साकारत तरुणीच्या हृदयाचा ठोका चुकविणारा हृतिक त्याच्या अफलातून नृत्य कौशल्यासाठी ओळखला जातो.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.