शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

राष्ट्रपतीतर्फे देशातील ११२ महिलांना 'फर्स्ट लेडी' पुरस्काराचा सन्मान - २० जानेवारी २०१८

राष्ट्रपतीतर्फे देशातील ११२ महिलांना 'फर्स्ट लेडी' पुरस्काराचा सन्मान - २० जानेवारी २०१८

* विविध क्षेत्रात विक्रम प्रस्थापित करणाऱ्या महाराष्ट्रातील १५ महिलांसह देशातील ११२ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहेत.

* केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात या महिलांनी विक्रम केला आहे.

* भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिल्या महिला नायिका महाराष्ट्र कन्या दुर्गाबाई कामत व देशातील पहिल्या महिला तबला वादक डॉ. अबन मिस्त्री यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.

* भारतरत्न मदर टेरेसा, कल्पना चावला, बचेंद्री पाल, ऐश्वर्या रॉय बच्चन, पी व्ही सिंधू, सानिया मिर्झा, गीता फोगट, सायना नेहवाल, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, मिताली राज आदी कर्तृत्ववान महिलांचाही फर्स्ट लेडी पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

* महाराष्ट्रातील १५ महिलांमध्ये पहिल्या महिला प्रवासी रेल्वेचालक सातारा येथील सुरेखा यादव, बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे, अग्निशामक अधिकारी हर्षिनी कान्हेकर, ऑटोरिक्षाचालक शीला डवरे, आमदार डॉ भरती लव्हेकर.

* चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला तंत्रज्ञ अरुणा राजे पाटील, भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडलजी, कार ड्रायव्हींग प्रशिक्षण संस्था स्थापन करणाऱ्या स्नेहा कामात.

* नोंदणीकृत गुप्तहेर रजनी पंडित, असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडियाच्या अध्यक्षा मुंबई येथील स्वाती परिमल, व्हाईट प्रिंट हे अंधांसाठी लाईफ स्टाईल मासिक ब्रेल लिपीत प्रकाशित करणाऱ्या उपासना मकाती, टेस्टट्यूब बेबीची प्रसूती करणाऱ्या स्त्रीरोगतज्ञ डॉ इंदिरा हिंदुजा, डिजिटल आर्टद्वारे भारतातील महिला योध्दाचा परिचय करून देणारी पहिली महिला कलाकार १८ वर्षीय तारा आनंद यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.