शुक्रवार, ५ जानेवारी, २०१८

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे निधन - ५ जानेवारी २०१८

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे निधन - ५ जानेवारी २०१८

* विधानपरिषदेचे उपसभापतिपद १७ वर्षे भूषविणारे आणि राजकारणातील अजातशत्रू, अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे वय ६८ यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

* राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असलेले डावखरे यांचे सर्व पक्षातील नेत्याशी स्नेहाचे संबंध होते.

* एक पेपर टाकणारा मुलगा ते विधान परिषद उपसभापती हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. विनोदबुद्धी हजरजबाबी आणि प्रचंड लोकसंग्रह हे डावखरे यांचे गुणविशेष होते.

* एका सामान्य माथाडी कामगाराच्या घरात जन्म घेऊन स्वकर्तृत्वावर डावखरे यांनी राजकारणात नाव कमावले. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९४९ रोजी हिवरे ता. शिरूर जि पुणे येथे झाला.

* काही काळ त्यांनी ठाणे महापालिकेत लिपिक म्हणून नोकरी केली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्वीयसहायक म्हणून काम पहिले. त्यानंतर ते राजकारणात आले.

* १९८६ ठाणे महापालिका स्थापन झाली तेव्हा काँग्रेसतर्फे नगरसेवक, काही काळ ठाण्याचे महापौर, विधान परिषदेवर चार वेळा निवड, १९९८ पासून विधान परिषदेचे उपसभापतीपद.

* १३ जुलै २०१० ला विधान परिषद उपसभापती फेरनिवड २५ मे १९९९ ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. काँग्रेस सोडून डावखरे राष्ट्रवादीत २०१० मध्ये विधानपरिषदेवर बिनविरोध. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.