सोमवार, १ जानेवारी, २०१८

तेलंगणात शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीजपुरवठा - १ जानेवारी २०१८

तेलंगणात शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीजपुरवठा - १ जानेवारी २०१८

* शेतीसाठी २४ तास अखंडपणे मोफत वीजपुरवठा करणार तेलंगणा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यातील २३ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. 

* नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही महत्वाची भेट दिली आहे. याची चाचपणी गेली अनेक महिने सुरु होती. नोव्हेंबर महिन्यात शेवटचे दोन आठवडे २४ तास अखंड वीजपुरवठ्याचा प्रयोग यशस्वी झाला. 

* त्यासाठी लागणाऱ्या ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनसाठी अंदाजे १३ हजार कोटी खर्च आला. आधी ९ हजार ५०० मेगावॅट वीज लागायची, आता मागणी वाढून ११ हजार मेगावॅटवर आली होती. ती आज १५ हजार मेगावॅटवर पोहोचली आहे. 

* काही राज्यामध्ये शेतीसाठी मोफत वीज दिली जाते. मात्र ती काही तासासाठी असते. तर काही राज्यात २४ तास वीज दिली जाते पण ती मोफत नसते. मात्र २४ तास अखंडपणे मोफत वीज देणारे तेलंगणा देशातील पहिले राज्य ठरले आहे. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.