रविवार, २८ जानेवारी, २०१८

जयदेव उनाडखट आतापर्यंतचा २०१८ मधील सर्वात महाग खेळाडू - २९ जानेवारी २०१८

जयदेव उनाडखट आतापर्यंतचा २०१८ मधील सर्वात महाग खेळाडू - २९ जानेवारी २०१८

* इंडियन प्रीमिअर लीग [IPL] २०-२० क्रिकेट स्पर्धेच्या ११ व्या हंगामासाठी बेंगळुरूत झालेल्या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडखट हा सर्वात महागडा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

* राजस्थान रॉयल्सने ११ कोटी ५० लाखांची सर्वाधिक बोली लावत त्याला संघात स्थान दिले आहे. याचप्रमाणे किंग्स इलेव्हन पंजाबने ७ कोटी २० लाख रुपये किंमत मोजून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टायला संघात स्थान दिले आहे.

* लिलावाच्या पहिली दिवशी अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशीद खानने ९ कोटी रुपयाची कमाई करीत लक्ष वेधले होते. उनाडखटसाठी दीड कोटी रुपयांची मूळ किंमत ठरविण्यात आली होती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.