शनिवार, २७ जानेवारी, २०१८

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादी हल्ल्यात ९५ जण ठार - २८ जानेवारी २०१८

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादी  हल्ल्यात ९५ जण ठार - २८ जानेवारी २०१८

* एका रुग्णवाहिकेद्वारा काबुल शहरातील गर्दीच्या ठिकाणी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात ९५ नागरिक ठार झाले. तालिबानने या हल्ल्याची जाबाबदारी स्वीकारली आहे.

* स्फोटकांनी भरलेली रुग्णवाहिका घेऊन आलेल्या एका आत्मघाती दहशतवाद्याने पहिल्या चेक नाक्यावर रुग्णवाहिकेतून एक रुग्ण असून त्याला जमुरियत रुग्णालयात नेत असल्याचे सांगत सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा दिला.

* त्यानंतर दुसऱ्या चेकनाक्यावर त्याने रुग्णवाहिकेतील स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. यात ९५ नागरिक ठार झाले. १५८ जण जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

* स्फोटाची तीव्रता एवढी होती की त्याची तीव्रता २ किमी अंतरावर जाणवली. या हादऱ्यामुळे आसपासच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

* तालिबानी दहशतवाद्यांनी नुकत्याच एका आलिशान हॉटेलवर केलेल्या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला होता. त्यात १५ विदेशी नागरिक होते. या पार्श्वभूमीवर रविवारी सुरक्षा यंत्रणांनी विदेशी नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.