रविवार, २१ जानेवारी, २०१८

ओमप्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती - २१ जानेवारी २०१८

ओमप्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती - २१ जानेवारी २०१८

* मुख्य निवडणूक आयुक्तपदी ओम प्रकाश रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या संदर्भातील घोषणा केली आहे.

* केंद्र सरकारने जारी केलेल्या एका पत्रकानुसार ही माहिती समोर आली आहे. अचल कुमार ज्योती यांच्या जागी आता ओम प्रकाश रावत आता काम पाहतील.

* अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपतो आहे. त्याचमुळे ओम प्रकाश रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* ज्योती यांच्या आधी नसीम जैदी मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांचा कार्यकाळ जुलै २०१७ मध्ये संपत होता. त्यानंतर अचल कुमार ज्योती यांनी हे पद स्वीकारले. आता ज्योती यांचा कार्यकाळ संपत असून ओम प्रकाश रावत हे मुख्य निवडणूक आयुक्त असतील.

* निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि इतर दोनजण निवडणूक आयुक्त असतात. या दोघांपैकी जो वरिष्ठ असेल त्याच व्यक्तीला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राष्ट्रपती तर्फे नेमले जाते.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.