बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

देशातील पहिल्या 'खेलो इंडिया' राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात - ३१ जानेवारी २०१८

देशातील पहिल्या 'खेलो इंडिया' राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात - ३१ जानेवारी २०१८

* पहिल्या वाहिल्या 'खेलो इंडिया' या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेला उद्या बुधवारपासून सुरुवात होत असून इंदिरा गांधी इनडोअर मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे.

* देशातील क्रीडा संस्कृतीला अगदी तळापासून चालना मिळावी या उद्देशाने खेलो इंडिया कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. विविध क्रीडा प्रकारातील भविष्यातील चॅम्पियन्सचा शोध घेण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग होणार आहे.

* या स्पर्धेतून गुणवान खेळाडू शोधण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली असून, निवडण्यात आलेल्या विविध खेळातील सुमारे एक हजार खेळाडूंना आठ वर्षांसाठी दरवर्षी ५ लाख रुपये असे आर्थिक साहाय्य मिळणार आहे.

* या स्पर्धेत शालेय स्तरावरील पहिलीच एकत्रित राष्ट्रीय स्पर्धा, १७ वर्षाखालील खेळाडूचा सहभाग, तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, फुटबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी, खो-खो, नेमबाजी, जलतरण, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती अशा १६ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

* ५ हजार खेळाडू, तांत्रिक अधिकाऱ्यांचा सहभाग, १९९ सुवर्ण रौप्य आणि २७५ ब्राँझपदक यांचा निर्णय घेण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.