सोमवार, १५ जानेवारी, २०१८

बर्कशायर हॅथवेच्या उपसंचालकपदी अजित जैन यांची नियुक्ती - १० जानेवारी २०१७

बर्कशायर हॅथवेच्या उपसंचालकपदी अजित जैन यांची नियुक्ती - १० जानेवारी २०१७

* बर्कशायर हॅथवे इंक कंपनीने भारतीय वंशाचे वरिष्ठ अधिकारी अजित जैन यांना इन्शुरन्स ऑपरेशन विभागाच्या उपमहासंचालकपदी बढती दिली आहे.

* सध्या कंपनीच्या विमा विभागाचे टॉप एक्झिकेटिव्ह असलेले अजित जैन हे भारतीय वंशाचे असून त्यांचा जन्म ओडिशा येथे झाला आहे.

* बर्कशायरच्या हॅथवेच्या मालकीच्या ९० हुन अधिक संस्था आहेत. ८७ वर्षीय वॉरेन बफे या कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १९६५ पासून बफे हे बर्कशायरचे संचालक आहेत.

* तर गेल्या चार दशकापासून बफे यांच्यासाठी काम करणारे ९४ वर्षाचे चार्ली मंगर हे कंपनीचे उपसंचालक आहेत. या दोघांच्या हाती कंपनीची सूत्र आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.