मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

भारतातील १४-१८ वयोगटातील शिक्षणाची स्थिती अहवाल - १६ जानेवारी २०१८

भारतातील १४-१८ वयोगटातील शिक्षणाची स्थिती अहवाल - १६ जानेवारी २०१८

* शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या 'प्रथम' संस्थेकडून दरवर्षी 'असर' नामक अहवाल प्रसिद्ध केला जातो. गतवर्षात म्हणजे २०१७ चा अहवाल सादर करण्यात आला.

* १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच सर्वेक्षण, त्यांची आकडेवारी आणि विश्लेषण या अहवालात आहे. मुलं आणि मुलीच्या शिक्षणातील तुलनात्मक गोष्टीही यात मांडण्यात आल्या आहेत.

* असर म्हणजे अन्युअल स्टेटस एज्युकेशन रिपोर्ट गेल्या १२ वर्षांपासून अहवाल प्रसिद्ध होतो. असर ने देशातील २४ राज्यातील २६ जिल्ह्यामध्ये जाऊन शिक्षणासंदर्भातील आकडेवारी गोळा करून विश्लेषण केले आहे.

* १४ ते १८ वयोगटातील २८ हजार ३२३ जणांपर्यंत पोहोचून असर ने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. सक्रियता, क्षमता, जनजागृती आणि आकांक्षा अशा भागामध्ये त्याच्याकडून माहिती गोळा करून विश्लेषण केले आहे.

* १४ते१८ वयोगटातील २८ हजार ३२३ जणांपर्यंत पोहोचून 'असर' ने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. सक्रियता, क्षमता, जनजागृती आणि आकांक्षा अशा भागामध्ये त्याच्याकडून माहिती गोळा केली.

* १४ ते १८ वयोगटातील जवळपास ८६% मुलं फॉर्मल एज्युकेशन [शाळा महाविद्यालयातील शिक्षण] घेत आहेत. निम्म्याकडून अधिक [५४ टक्क्यापेक्षा कमी] विद्यार्थी दहावीपर्यंत पोहोचवितात.

* त्यानंतर २५% विद्यार्थी अकरावी आणि बारावीपर्यंत, तर ६ विद्यार्थी पोहोचतात. सुमारे १४% विद्यार्थी फॉर्मल एज्युकेशन घेत नाहीत.

* वाढत्या वयानुसार फॉर्मल एज्युकेशनमधील मुलं आणि मुलांच्या संख्येच्या पट चढ-उताराचा होत जातो. वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत मुलगा किंवा मुलगी यांच्यातील फरक फार नसतो. मात्र जसजसे वय वाढते, तसेच मुलींची संख्या कमी होते.

* १४ ते १८ वयोगटातील जवळपास २५% मुलांना अद्याप मातृभाषेतील मूलभूत वाचनही करता येत नाही. निम्म्याहून अधिक जणांचा गणिताची समस्या बिकट आहे. ४३% जणांना तीन अंकी संख्येचा भागाकार जमतो.

* त्याचसोबत १४ वर्षाचे केवळ ५३% जणच इंग्रजीतील नेहमीची वाक्य वाचू शकतात. इंग्रजी वाक्य वाचण्याचे प्रमाण १८ वर्षाच्या मुलामध्ये ६०% आहे. म्हणजे फारशी प्रगती दिसत नाही.

*विशेष म्हणजे, इंग्रजी भाषेतील प्रगती वाढत असल्याची दिसून येते. मात्र त्याचवेळी गणित विषयात निराशा आहे. त्यात प्रगतीची वाढ अपेक्षित होत नाही.

* १४ ते १८ वयोगटातील जवळपास ७३% मुल मोबाईल फोन वापरतात. यातही मुलं आणि मुलींमधील आकडेवारीतील फरक रंजक आहे. १२% मुलं कधीच मोबाईल फोन वापरत नाहीत. तर त्याचवेळी दुसरीकडे २२% मुली मोबाईल फोन वापरतात.

* १४ वर्षाच्या मुलाचं मोबाईल वापरण्याच प्रमाण ६४%, तर तेच १८ वर्षांच्या मुलामध्ये ८२% आहे. इंटरनेट आणि कॉम्पुटर वापराबाबतही रंजक आकडेवारी आहे. २८% मुले इंटरनेट तर २६% मुले कॉम्प्युटर वापरतात.

* त्याचवेळी ५९% मुले कधीच कॉम्प्युटर वापरत नाहीत. तर कधी ६४% मुलं कधीच इंटरनेट वापरत नाहीत. यामध्ये इंटरनेट किंवा कॉम्प्युटर वापरात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तुलनेत कमी आहे.

* १४ ते १८ वयोगटातील जवळपास ६०% मुलांना १२ विच्या पुढेही शिक्षण घ्यावे. ज्यांना नीट वाचता येत नाही. त्याच्यामध्ये बारावीपर्यंत शिकण्याचे स्वप्न बाळगण्याचे प्रमाण निम्म्यावर ३५% एवढे येते.

* मुलं आणि मुली यांच्या आकांक्षा विभागात अनेक मुलं सैन्य, पोलीस, इंजिनिअर तर अनेक मुली शिक्षिका नर्स, अशा क्षेत्राला पसंती देतात. विशेष म्हणजे याच वयोगातील जवळपास ४०% मुलांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आदर्श अशी व्यक्तीच नाही.


















0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.