गुरुवार, ४ जानेवारी, २०१८

प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे निधन - ४ डिसेंबर २०१७

प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे निधन - ४ डिसेंबर २०१७

* प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील हिंदुजा रुग्णायात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

* दीड महिन्यापूर्वी जमशेदपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान उल्हास बापट आजारी पडले. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता.

* पंडित उल्हास बापट यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. त्यांचे वडील पोलीस उपायुक्त गणेश बापट हे प्रसिद्ध गायक होते.

* त्यामुळे घरातच संगीताचा वारसा होता. उल्हास बापट यांचाही संगीताचा असलेला कल पाहून, वडिलांनी त्यांनी पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवले.

* १९७५ मध्ये पहिल्यांदा त्यांनी संतूर वादन सादर केले. पंडित रविशंकर यांच्या मुंबईतील 'संचरिणी' या खासगी बैठकीत त्यांनी हे सादरीकरण केले होते.

* जगातील सर्वोत्कृष्ट संतूरवादकांमध्ये उल्हास बापट यांचं नाव घेतलं जात. संतूरच्या तारा जुळवण्यासाठी [क्रोमॅटिक सिस्टीम] या पद्धतीचा वापर करणारे, ते एकमेव संतूरवादक होते.

* जैत रे जैत, घर, १९४२ : अ लव्हस्टोरी यासारख्या सिनेमातील गाण्यामध्ये उल्हास बापट यांचा वापर झाला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.