रविवार, २८ जानेवारी, २०१८

रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनचा २०१८ विजेता - २८ जानेवारी २०१८

रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनचा २०१८ विजेता - २८ जानेवारी २०१८

* रॉजर फेडरर याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत क्रोएशियाच्या मारिन सिलीचल ६-२, ६-७, ६-३, ३-६, ६-१ अशा सेटमध्ये हरवले. रॉजर फेडररने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद जिंकले. गेल्यावर्षी फेडररने सिलीचला हरवूनच विजेतेपद पटकावले. 

* रॉजर फेडररचे टेनिस करिअरमधले २० वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या या लढतीत फेडररने पहिला, तिसरा, आणि पाचवा सेट जिंकून आपले विजेतेपद निश्चित केले. 

* पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिसपटू फेडरर ठरला आहे. स्वित्झर्लंडचा फेडरर आणि क्रोएशियाचा सिलीच हे दोघेही आतापर्यंत दहावेळा प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर आले आहेत. 

* या १० पैकी ९ वेळा रॉजर फेडरर विजयी झाला आहे. तर एकदा सिलीच विजयी झाला. सिलिचने २०१४ मध्ये अमेरिका ओपनमध्ये फेडररचा पराभव केला होता. 

* जगातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे खेळाडू - रॉजर फेडरर २० ग्रँडस्लॅम, राफेल नदाल १५ ग्रँडस्लॅम, पीट सम्प्रास १४ ग्रँडस्लॅम, रॉय एमरसन १२ ग्रँडस्लॅम, नोवोक जोकोविच - १२ ग्रँडस्लॅम.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.