सोमवार, २९ जानेवारी, २०१८

ग्रँडमास्टर विदितचे टाटा मास्टर्स चॅलेंजर विजेतेपद - ३० जानेवारी २०१८

ग्रँडमास्टर विदितचे टाटा मास्टर्स चॅलेंजर विजेतेपद - ३० जानेवारी २०१८

* नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. रविवारी पार पडलेल्या स्पर्धेतील या कामगिरीसह त्याने पुढील वर्षी होणाऱ्या मास्टर्स स्पर्धेतील सहभाग नक्की केला.

* विदित आणि युक्रेनचा ग्रँडमास्टर अँटन कोरोबोव यांच्यात बरीच चुरस होती. ११ व्या फेरीअखेर दोघांचे प्रत्येकी ७.५ गूण होते. त्या फेरीत दोघांची बरोबरी झाल्यामुळे चुरस वाढली होती.

* या विजयामुळे तो जागतिक क्रमवारीत पहिल्या ३० जणात स्थान मिळवण्याची अपेक्षा आहे. विदित भारतीय खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

* विदितने गेल्या वर्षी २७०० एलो रेटिंग्सचा टप्पा पार केला आहे. ही कामगिरी करणारा तो विश्वनाथन आनंद, पी हरिकृष्णन आणि के शशिकिरण यांच्यानंतर चौथा भारतीय ठरला आहे.

* आता पुढील वर्षी मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, वेस्ली सो अशा खेळाडूविरुद्ध खेळण्यास मी आतुर आहे. या कामगिरीमुळे जगातील प्रमुख स्पर्धासाठी आमंत्रण मिळण्याची आशा आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.