मंगळवार, २ जानेवारी, २०१८

काही नवीन चालू घडामोडी - ३ जानेवारी २०१८

काही नवीन चालू घडामोडी - ३ जानेवारी २०१८

* लॉस एंजिल्स आणि न्यूयॉर्क येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [जस्ट वन मोअर डे] या चित्रपटाचे स्थान मिळविले आहे.

* भारतीय महिला वैज्ञानिक प्रा. यमुना कृष्णन यांना भौतिकशास्त्र विषयातील इन्फोसिस पुरस्कार २०१७  जाहीर झाला आहे.

* दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी नवीन वर्षात नवीन पक्ष स्थापन करून राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली.

* संशोधकांना अंदमानच्या जंगलामध्ये 'मुंगी' या कीटक वर्गातल्या जीवांच्या रंगीबेरंगी आणि सुरेख अश्या दोन नवीन प्रजाती आढळून आल्या आहेत.

* भारतातील सिक्कीम नंतर अरुणाचल प्रदेश हागणदारी मुक्त होणारा ईशान्य भारतातला हे दुसरे राज्य आहे.

* बल्गेरिया या देशाकडे युरोपियन संघाचे राष्ट्राध्यक्षपद आले आहे. ही निवड १ जानेवारी २०१८ पासून सहा महिन्यासाठी झाली आहे.

* भारतीय गोल्फपटू शिव कपूरने याने वर्षाच्या अखेरचे रॉयल चषक कप जिंकले. हा त्याचा या वर्षातला तिसरा आशियाई टूर किताब आहे.

* केरळच्या तिरुअनंतपुरम मध्ये आयोजित ६१ व्या राष्ट्रीय नेमबाजी विजेतेपद स्पर्धेच्या पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारचे विजेतेपद जितू रायने पटकावले आहे.

* इंफाळमधील मणिपूर केंद्रीय विद्यापीठात २०१८ भारतीय विज्ञान परिषद [इंडियन सायन्स काँग्रेस -ISC] आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

* केरळ व्यवस्थापन अभ्यासक्रमांची पायाभरणी करणारे द्रष्टे शिक्षण व्यवस्थापक डॉ एम व्ही पैली यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी ३० डिसेंबर रोजी निधन झाले.

* दहशतवादीविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून देण्यात येणारी २५५ दशलक्ष डॉलरची मदत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोखली आहे.

* नासा अमेरिकी अवकाश संस्थेच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकानी जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती विकसित केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.