शनिवार, ६ जानेवारी, २०१८

भारतात होतात रोज ३,६०० बालविवाह - ६ जानेवारी २०१८

भारतात होतात रोज ३,६०० बालविवाह - ६ जानेवारी २०१८

* भारतात रोज होत असलेल्या सुमारे ३,६०० बालविवाहाची गंभीर नोंद घेत, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने राज्यांना ही सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी अत्यंत कठोर धोरण अवलंबून २००६ च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यास सांगितले.

* आयोगाचे सरचिटणीस अंबुज शर्मा यांनी गुरुवारी बालविवाहावरील विभागीय परिषदेत सांगितले की १८ वर्षाखालील मुलांचे विवाह ही राष्ट्रीय समस्या बनत चालली आहे.

* ते थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कृती योजना तयार करणे हा या परिषदेचा हेतू आहे. कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करताना संबंधित संस्थांपुढे असलेली आव्हाने आणि बालविवाहाचा शोध लावणे व त्याची नोंदणी करण्यासाठी निकष तयार करण्यावरही चर्चा होईल.

* जगात होणाऱ्या बालविवाहांपैकी ४० टक्के भारतात होतात. रोज ३,६०० असे विवाह लागतात. असे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या एनसीआरबी हवाल्याने निवेदनात म्हटले आहे. प्रत्यक्ष मोजक्याच बालविवाहाची नोंद होते.

* राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी-४ च्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये झालेल्या एकूण विवाहांपैकी ४०.७ विवाह अल्पवयीनांचे होते. बिहारमध्ये ३९.१, झारखंडमध्ये ३८, तर ३५.४% राजस्थानात विवाह लागतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.