सोमवार, १५ जानेवारी, २०१८

एक जुलैपासून चेहराही बनणार 'आधार' - १६ जानेवारी २०१८

एक जुलैपासून चेहराही बनणार 'आधार' - १६ जानेवारी २०१८

* आधार कार्डच्या साह्याने ओळख पटविण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या बायोमेट्रिक म्हणजेच बोटांचे ठसे आणि बुबुळांचा रंग यांच्याबरोबर आता संबंधीत व्यक्तीच्या चेहऱ्याचाही समावेश करण्यात आला आहे.

* शारीरिक श्रमाची कामे करणाऱ्या व्यक्ती, तसेच वयाने ज्येष्ठ व्यक्तीच्या बोटांचे ठसे हे अनेक वेळेस 'आधार' कार्डात समाविष्ट ठशांशी जुळत नसल्याच्या तक्रारी वाढत होत्या.

* त्या पार्श्वभूमीवर आता चेहऱ्याच्या आधारे म्हणजेच 'आधार' कार्ड काढताना घेतलेले छायाचित्र व त्यातील चेहरा याच्याशी संबंधीताचा चेहरा पडताळून पाहून ओळख पाठविण्याची पद्धतीही अवलंबविण्यात येईल.

* आधार कार्डची व त्यातील माहितीची सुरक्षितता अभेद्य नसल्याचे काही प्रकार उघडकीस आल्यानंतर गेल्या काही दिवसात 'आधार कार्डाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्याचे काम सुरु आहे.

* चेहरेपट्टी जुळवण्याचाच एकमेव ओळख पटविण्याचा निकष नसेल. इतर निकषांशी संलग्न असाच हा निकष असेल आणि संमिश्र पद्धतीनेच हे निकष अमलात आणले जातील. असे प्राधिकरणाने सांगितले आहेत.

* म्हणजे चेहरा आणि बोटांचे ठसे किंवा चेहरा व बुबुळांचा रंग अशा संमिश्र पद्धतीने व्यक्तीची ओळख पटकाविण्यात येईल. केवळ चेहरेपट्टीचा एकमेव निकष लागू होणार नाही. आवश्यकतेनुसार हे निकष लागू होतील.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.