बुधवार, ३ जानेवारी, २०१८

राज्यातील भीमा कोरेगाव प्रकरण - ३ डिसेंबर २०१७

राज्यातील भीमा कोरेगाव प्रकरण - ३ डिसेंबर २०१७

* पुणे - अहमदनगर मार्गावरील भीमा कोरेगाव मध्ये १ जानेवारी रोजी किरकोळ वादातून दोन गटामध्ये वाद झाला. वढू बुद्रुक या गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी रॅलीचे आयोजन केले.

* ही रॅली सुरु असतानाच पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने कोरेगाव क्रांतीस्तंभाला मानवंदना अर्पण करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी येत होते.

* यावेळी रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झाले. या दगडफेक व जाळपोळीत झाले. या दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

* यानंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र या घटनेचे पडसाद २ जानेवारी रोजी राज्याच्या अन्य भागामध्ये उमटले.

* 'भीमा कोरेगावचा खरा इतिहास'

* पुण्यातील भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावमध्ये १ जानेवारी १८१८ रोजी एक लढाई झाली होते. हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यामध्ये झाले असले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते.

* महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले. ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरविण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे इतिहासकार म्हणतात.

* पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या काही हजारांमध्ये होती तर इंग्रजांची केवळ हजाराहून कमी सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते.

* महार रेजिमेंटने आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवला आणि अवघ्या १६ तासामध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ येईल.

* त्यानंतर महार सैनिकांनी अखेर १ जानेवारी १८१८ या सायंकाळी आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला.

* भीमा कोरेगाव या लढाईत महार रेजिमेंटने इंग्रजांना विजय मिळवून दिला. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या या सैनिकांनी या लढाईत प्राणांची आहुती दिली.

* त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्या शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य क्रांतीस्तंभ उभारला.

* १ जानेवारी १९२७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांती स्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली.

* आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी १ जानेवारीला भेट देत आदरांजली अर्पण करतात. परंतु मागील २०० वर्षांमध्ये जो अनुचित प्रकार येथे घडला नव्हता तो १ जानेवारी २०१८ रोजी घडला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.