शनिवार, २७ जानेवारी, २०१८

परेडमधील महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक प्राप्त - २८ जानेवारी २०१८

परेडमधील महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक प्राप्त - २८ जानेवारी २०१८

* यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रपाठोपाठ आसामचा चित्ररथ दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला.

* प्रजासत्ताक दिनी राजपथावर विविध राज्यांचे तसेच दूरदर्शन, सैन्यदलासह विविध खात्याचे चित्ररथ साकारण्यात आले होते. महाराष्ट्राने यावर्षी शिवराज्यभिषेकचा चित्ररथ साकारला होता.

* तर आसामने स्थानिक लोककलावर आधारित चित्ररथ साकारला होता. छत्तीसगढच्या चित्ररथाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होत.

* यापूर्वीही २०१५ साली महाराष्ट्राच्या चित्ररथाने पाहिलं पारितोषिक मिळवलं होत. महाराष्ट्राचं वैभव देशालाच नव्हे तर जगाला सांगणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळा या चित्ररथाचा पाहिलं पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

* यावेळी राजपथावर १४ राज्यासह केंद्र सरकारच्या ७ खात्याचे आणि भारत आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे २ चित्ररथ असे एकूण २३ चित्ररथ होते.

* महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या सुरवातीला किल्ल्याची प्रतिकृती असून त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारूढ प्रतिकृती दर्शविण्यात आलेली होती. तर मध्यभागी रायगडची प्रतिकृती आणि त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवण्यात आले.

* या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याचा शेजारी गागाभट्ट, तर या राज्यभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवण्यात आले.

* दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजी राजे दाखवण्यात आले. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शविण्यात आल्या. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.