शनिवार, २७ जानेवारी, २०१८

बेन स्टोक आयपीएल २०१८ चा सर्वात महागडा खेळाडू - २७ जानेवारी २०१८

बेन स्टोक आयपीएल २०१८ चा सर्वात महागडा खेळाडू - २७ जानेवारी २०१८

* आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूचा वरचष्मा राहिलेला पाहायला मिळाला. प्रत्येक संघ मालकांनी अखेरच्या सत्रामध्ये भारतीय खेळाडूंना खरेदी करण्यामध्ये रस दाखवला.

* इंग्लंडचा बेन स्टोक पहिल्या दिवशीच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाने तब्बल १२ कोटी ५० लाख रुपये मोजून त्याला आपल्या ताफ्यात दाखल केलं आहे.

* याव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस लिन, ख्रिस वोक्स, मार्क्स स्टोयनीस या परदेशी खेळाडूंचा चंगल्या रकमेची बोली पाहायला मिळाली. महत्वाची गोष्ट म्हणजे विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला घेण्यात कोणत्याही संघमालकाने स्वारस्य दाखवलं नाही.

* एक काळ आयपीएलचा हंगाम गाजवणाऱ्या अनुभवी भारतीय खेळाडूंना यंदाच्या हंगामात थोडक्यात समाधान मानावं लागल. अनेक खेळाडूंना संघमालकानी त्यांच्या मूळ किमतीवरच विकत घेतलं.

* काही वर्षांपूर्वी लिलावात १० कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळवणाऱ्या युवराजसिंगला यंदाच्या हंगामात अवघ्या २ कोटीवर समाधान मानव लागलं. त्याला किंग्स इलेव्हन पंजाब संघाने विकत घेतलं. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.