बुधवार, २४ जानेवारी, २०१८

जागतिक सर्वसमावेशक विकास निर्देशांक २०१८ - २३ जानेवारी २०१८

जागतिक सर्वसमावेशक विकास निर्देशांक २०१८ - २३ जानेवारी २०१८

* जागतिक आर्थिक परिषदेच्या [WEF] सर्वसमावेशक विकास निर्देशांक -२०१८ मध्ये भारत शेजारील चीन व पाकिस्तन या देशांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. 

* आज जाहीर झालेल्या १०३ देशांच्या यादीत भारत ६२ व्या स्थानावर असून चीन व पाकिस्तान अनुक्रमें २६ व ४७ या स्थानावर आहेत. 

* WEF- World Economic Fouram ची बैठक दावोस येथे सुरु असून या पार्श्वभूमीवर जगातील १०३ अर्थव्यवस्थांचे मूल्यांकन करून त्याची क्रमवारी दर्शविणारी यादी जाहीर करण्यात आली आहे. 

* ही क्रमवारी विकासाचा वेग, निष्पक्षपणा आणि स्थैर्य या निकषावर आधारित असून या पाहणीची २ भागात विभागणी करण्यात आली आहे. 

* पहिल्या भागात जगातील २९ विकसित देश तर दुसऱ्या भागात ७४ विकसनशील अर्थव्यवस्थाचा समावेश करण्यात आला आहे. 

* भारत यामध्ये ६२ व्या स्थानावर आहे. २०१७ साली जाहीर केलेल्या यादीत भारत ६० व्या स्थानावर होता. ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थेच्या रशियन फेडरेशन १९ व्या ब्राझील ३७ व्या, तर दक्षिण आफ्रिका ६९ व्या स्थानावर आहे. 

* [जी-७] अर्थव्यवस्थांपैकी जर्मनी १२, कॅनडा १७, फ्रान्स १८, ब्रिटन २१, अमेरिका २३, जपान २४, आणि इटली २७ व्या स्थानावर आहे. 

* सर्वसमावेशक विकास निर्देशांकात लिथुआनियाने उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तेथेच नॉर्वेची सर्वात पुढारलेली अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली आहे. 

* उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील जीडीपीचा विचार करता [६.८%] विचार चीनने जगात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.