मंगळवार, ३० जानेवारी, २०१८

राज्याची महिला आरोग्यासाठी नवीन 'अस्मिता' योजना - ३१ जानेवारी २०१८

राज्याची महिला आरोग्यासाठी नवीन 'अस्मिता' योजना - ३१ जानेवारी २०१८

* राज्याच्या ग्रामीण भागातील महिला व ११ व १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वछतेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासह त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्द करून देण्यासाठी अस्मिता योजना राबविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

* मासिक पाळीच्या योग्य ती काळजी न घेतल्याने महिला आणि मुलींमध्ये प्रजननाशी निगडित अनेक समस्या निर्माण झाल्याचे ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात निदर्शनात आले आहे.

* तसेच ११ व १९ वयोगातील किशोरवयीन मुली सर्वसाधारणपणे वर्षातील ५० ते ६० दिवस मासिक पाळीच्या काळात अनुपस्थित राहण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

* हे टाळण्यासाठी ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वछता व आरोग्याच्या काळजीबाबत जनजागृतीची गरज ओळखून ही योजना राबविण्यात येत आहे.

* या योजनेअंतर्गत उमेदपुरस्कृत स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व किशोरवयीन मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करण्यात येणार आहे.

* अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहायता समूहाद्वारे ग्रामीण भागात महिलांना 'अस्मिता' या ब्रँड नावाने २४०
मिलीमीटर आठ सॅनिटरी नॅपकिन २९ रुपये प्रतिपॅकेट याप्रमाणे उपलब्द करून देण्यात येणार आहेत.

* या योजने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळामधील ११-१९ या वयोगटातील मुलींना ५ रुपये प्रतीपॅकेट याप्रमाणे सवलतीच्या दराने सॅनिटरी नॅपकिन उपलब्द करून देण्यात येणार आहेत.

* तसेच या योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकिनची मागणी नोंदविण्यासाठी व पुरवठा करण्यासाठी विशिष्ट 'अँप तयार केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.